Sunday, July 13, 2014

भारतीयांच्या मानसिक गुलामीची कीव वाटते.


गेली शेकडो वर्षे भारत देश पारतंत्र्यात होता, पण त्या काळी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य जपत होते. त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठी लढले. अनेकांनी बलिदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज अनेक भारतीय गुलामीतच जगत आहेत, हि गुलामी मानसिक आहे, वैचारिक आहे. 
परवा एका इंग्रजी शाळेत लहान मुलांना शिक्षकांनी खूप मारले कारण ते मराठीत बोलत होते.  अशा नालायक शिक्षकांची कीव वाटते. स्वतः गुलाम आहेतच पण पुढील पिढ्या सुद्धा यांना गुलाम घडवायच्या आहेत. पुण्यासारख्या सुधारलेल्या शहरात अशा घटना घडत आहेत. मी भारत भर अशा शेकडो शाळा पहिल्या आहेत, जिथे इंग्रजी बोलणेच आवश्यक असते. स्थानिक भाषेला काही महत्व नाही. पालक सुद्धा मूर्ख आहेत, आणि शाळेत शिकवण्याचे नाटक करणारे महामूर्ख. अशांना शिक्षक म्हणणे योग्य वाटत नाही.

No comments:

Post a Comment